भारताचा राष्ट्रध्वज: Making of Indian National Flag and Role of Dr. Babasaheb Ambedkar

नियतीशी केलेला करार/ Tryst With Destiny

काय म्हणाले जवाहरलाल नेहरू?:  "Long years ago, we made a tryst with destiny; and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom." हे भाषण नेहरू यांनी 14-15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री केले होते. त्याच दिवशी पहाटे 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला.  
जवाहरलाल नेहरू यांचे मराठीत भाषण असे की,  "कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आता वेळ आली आहे, जेव्हा आपली ही प्रतज्ञा- पूर्णपणे नसली, तरी काही अंशी- साकारणार आहोत. मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो, की जेव्हा आपण जुन्यातून नव्यात प्रवेश करतो, एक मोठे युग संपते आणि दीर्घ काळ दबल्या गेलेल्या देशाच्या आत्म्याला वाचा फुटते. अशा या गंभीर क्षणी आपण भारताच्या, भारतवासीयांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा मानवतेच्या कार्याला वाहून घेण्याची प्रतज्ञा करीत आहोत, हे यथार्थ आहे"


अहिंसेचे प्रतिक: Ashok Chakra a Symbol of Non-violence

जवाहरलाल नेहरू यांचे भाषण आजच्या पिढीला माहिती नसले तरीही त्यांचे इंग्रजीतील भाषण आजही युटूबवर ऐकायला मिळते. त्याची लिंक पुढे दिली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मीतीचा विषय ज्यावेळी चर्चीला जातो. त्यावेळी आपल्याला त्याच्या इतिहासात जावे लागते. त्यातही या तिरंग्यात अशोक चक्र कसे आले, याचा विचार केला तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कारण त्यांच्या संमतीशिवाय, मान्यतेशिवाय ते शक्यच नव्हते. (How Dr. Ambedkar by advocating Ashok Chakra on the Indian National flag given a strong massage of non-violence to the ages to come). डॉ. आंबेडकर यांनी अशोक चक्र तिरंग्या ध्वजात समाविष्ट करून येणार्‍या पिढीला अहिंसेचा खूप मोठा संदेश दिला आहे.


काय आहे सम्राट अशोकाची अहिंसा? Non-violence of Emperor Ashoka

सम्राट अशोक (इ.स.पू.३०३—२३२): अफगाणिस्तानपासून ते थेट बंगालच्या खाडीपर्यंतच्या अफाट भूप्रदेशावर सार्वभौमत्व स्थापन करणारा सम्राट अशोक भारतीय इतिहासातील एकमेव योद्धा होता. त्याच्यानंतर असा सम्राट जन्मला नाही. त्यामुळेच अशोक सर्वश्रेष्ठ भारतीय सम्राट मानला जातो. अशोकाने आपल्या साम्राज्यात अनेक ठिकाणी शिलालेख उभारले आहेत. त्यामूळे आपल्याला प्राचीन भारत आणि अशोकाचे राज्य कसे होते, याबाबत माहिती मिळते. (Preaching of Lord Buddha is message of non-violence by Emperor Ashoka)


कलिंग युद्ध Kalinga War History in Short

याच शिलालेखांपैकी १३ व्या शिलालेखात या युद्धाचा उल्लेख सापडतो. या शिलालेखात अशोकाने म्हटले आहे, की ‘कलिंग देशाबरोबरील युद्धात एक लाख सैनिक मारले गेले, दीड लाख बेपत्ता झाले आणि त्याहून जास्त जखमी झाले’, युद्ध संपल्यावर पसरलेल्या रोगराईत अनेक प्रजाजन मृत्यू पावले. (Kalinga war- the most voilent war in the history of world) या रक्तपातामूळे सम्राट अशोक शोकग्रस्त झाला आणि त्याच्या मनात ऐहिक सुखांबाबत अतीव विरक्ती निर्माण झाली. त्यानंतर त्याने सत्य आणि अहिंसावादी बौद्ध धर्म स्वीकारला. जगाच्या इतिहासातील ही एकमेव घटना अशी आहे की, तलवारीच्या जोरावर युद्ध जिंकणार्‍या सम्राटाने तलवारीचाच त्याग केला. क्रोधाला प्रेमाने, शत्रूला मित्रत्वाने, पापाला पुन्याने जिंकण्याचा बुद्धाचा संदेश म्हणजेच सम्राट अशोकाची अहिंसा.  
Prime Minister Jawaharalal Neharu Delivering Historical Speech on 15th August 1947


राष्ट्रध्वाजाला अंतीम रूप दिले एका मुस्लिम कुटूंबाने? Muslim Family Behind the National Flag Formation

काही इतिहासकारांच्या मते The final color version of the flag was created by Badruddin Faiz Tyabji and his wife Surayya. म्हणजेच बद्रुदीन त्यबजी व त्यांची पत्नी सुरय्या यांनी राष्ट्रध्वजाला अंतीम रूप दिले आहे. इतिहाकार (Historian Trevor Royle, in his book, 'The Last Days of the Raj') ट्रेव्होर रॉयल यांनी त्यांचे पुस्तक The Last Days of the Raj मध्ये याचा उल्लेख केला आहे. या तिरंग्या ध्वजामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा रंग होता. महात्मा गांधी यांना या ध्वजात (Mahatma Gandhi wanted a spinning wheel on the flag) चरखा हवा होता. परंतू (Dr. Ambedkar recommended Ashoka Wheel) डॉ. बाबासाहेबांनी अशोक चक्र सूचविले आणि त्यावर सर्वांची संमती झाली.


भारताचा सर्वात पहिला राष्ट्रध्वज First National Flag of India Prepared by Madame Bhikai Cama 

भारताचा सर्वात पहिला राष्ट्रध्वज मादाम कामा यांनी तयार केला होता. मादाम कामा यांनी सर्व प्रथम स्टूटगार्ट येथे 1907 मध्ये हा ध्वज फडकविला होता. (Madame Bhikai Cama first unfurled a flag in Stuttgart, Germany, in August 1907). कामा यांचा ध्वज म्हणजे वरच्या भागात हिरवा रंग, केशरी रंग मध्ये आणि लाल रंग खालच्या बाजूला असा होता. तसेच आठ कमळ आणि वंदे मातरम हे घोषवाक्य सुद्धा लिहिले होते. सोबत चंद्राची कोर आणि सुर्यही होता. 1917 मध्ये असाच एक ध्वज अ‍ॅनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा केला होता. 
Ashoka Pillar Wheel


ध्वज समितीचा निर्णय ठरला महत्वाचा Flag Committee of the Constituent Assembly Approved Final Version of Tri-color

घटना समितीच्या ध्वज समितीत Drafting Committee Chairman Dr. B.R. Ambedkar, eminent legislators and national leaders such as Abdul Kalam Azad, K.M. Panikar, Sarojini Naidu, C. Rajagopalachari, K.M. Munshi, and Constitution Committee Chairman Rajendra Prasad हे होते. या समितीमधील काही जणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज स्विकारण्याची सूचना केली होती. कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक योगदान दिले होते. परंतू समितीने काही बदल करून हा ध्वज स्विकारण्यास तयारी दर्शविली.

 

राष्ट्रध्वजामधील चक्र व रंगाचे अर्थ, Meaning of Color and Ashok Chakra in National Flag of India
SAFFRON- represents Patriotism, Courage, and the spirit of Renunciation.
WHITE- color in the middle represents Purity, Transparency, and Truth, and
GREEN- at the bottom represents Peace, Prosperity, Faith, and Fertility.
Superimposed The wheel on Ashokan Pillar- Symbol of Non-violence.
भगवा/केशरी- राष्ट्रप्रेम, शौर्य आणि त्याग
श्वेत/ पांढरा- सत्य, पारदर्शकता, शुद्धता
हिरवा-  शांती, समृद्धी, विश्वास, सुपिकता
चक्र- अहिंसा
हा ध्वज भारताच्या घटना समितीने 22 जुलै 1947 रोजी स्विकारला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी सर्व प्रथम 15th August 1947 रोजी लाल किल्ल्यावर फडकविण्यात आला. हा ध्वज पिंगली वेंकय्या (बल्टानपेनुमर्रू, मच्छलीपटनम, आंध्र प्रदेश) यांनी तयार केला होता. त्यांनी मधोमध चरखा टाकला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चरख्या ऐवजी 24 आरे असणारे बुद्ध धम्माचे प्रतिक अशोक चक्र सूचविले आणि शेवटी त्याला संविधान सभेच्या ध्वज समितीने मान्यता दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अहिंसेचे खरेखूरे आणि जिवंत प्रतिक हवे होते. आणि ते अशोक चक्राशिवाय, कोणतेचे असू शकत नाही, असे त्यांनी घटना समितीत पटवून दिले.  Dr. Ambedakr wanted a symbol of true non-violence in the national flag. And none other than the Ashoka Chakra represents true non-violence. The flag committee also upheld the recommendations made by Dr. Ambedkar and the final flag came into existence.


-By Raavan Dhabe,
raavan@yahoo.com

Post a Comment

0 Comments

Ad Code