बहुजन मजूर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद: आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बहूमान

वाशिम येथे दिनांक २७ मार्च २०२२ रोजी पार पडलेल्या बैठकीत बहुजन मजूर पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली. ही निवड म्हणजे आजवरच्या माझ्या राजकीय जिवनातील सर्वोच्च पद आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर आणि मानवी हक्क अभियानाचे डॉ. मिलिंद आव्हाड यांनी ही नियुक्ती केली आहे. मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत ॲड. एकनाथ आव्हाड आणि विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांनी स्थापन केलेला हा पक्ष गेल्या १५ वर्षांपासून दलीत, आदिवासी, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी झटत आहे. या पक्षाची महाराष्ट्र प्रदेशाची जबाबदारी ॲड. रावण धाबे यांच्यावर टाकण्यात आली आहे. यावेळी प्रदेश मुख्य सल्लागार केशव अवचार, प्रदेश प्रवक्ते जगदीश ताकतोडे, रोहिणी खंदारे आदी उपस्थित होते.
बहुजन मजूर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब क्षिरसागर यांनी माझा सत्कर केला.

मानवी हक्क अभियानात मी गेल्या 15 वर्षांपासून सक्रीय आहे. विशेषतः दैनिक सामनामध्ये काम करीत असताना माझा मानवी हक्क अभियानाशी संकर्प आला. याच काळात केशव अवचार, चंद्रकांत अवचार, राधिका चिंचोलीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नेत्यांशी माझा संपर्क आला. त्यातही विशेष बाब म्हणजे, मानवी हक्क अभियानाचे प्रमुख अ‍ॅड. एकनाथ दादा आव्हाड उर्फ जिजा यांच्याशी माझा जवळचा संपर्क आला. नंतरच्या काळात मानवी हक्क अभियानाचे दुसरे नेते दादासाहेब क्षिरसागर यांच्याशी सुद्धा परिचय झाला. जिजा गेल्यानंतर या अभियानाला काहीशी मरगळ आली. तसेच अ‍ॅड. एकनाथ दादा आव्हाड - जिजा आणि दादासाहेब क्षिरसागर यांच्या प्रयत्नामूळे स्थापन झालेल्या बहुजन मजूर पक्षाला सुद्धा मरगळ आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाला आदर्श माणून हा पक्ष स्थापन करण्यात आला होता. वर्गवाद आणि वर्णवाद हे दोन्ही वाद- म्हणजेच विचार भारताला पोखरून टाकत असून त्यांना गाडल्याशिवाय देशाचे आणि समाजाचे आणि त्यातही बहूजन समाजाचे काधीही भले होणार नाही, अशी ठाम भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ रोजी केली होती. या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच अध्यक्ष होते.  दलित वर्ग कर्मचारी परिषद १२, १३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, की 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.' त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढविली.

मुंबई प्रांतात १७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची मानली होती. या निवडणूकीत मजूर पक्षाने १५ उमेदवार उभे केले होते आणि इतर दोन उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: मुंबईमधून उभे होते. पक्षाने उभे केलेल्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार व पाठिंब्याचे दोन असे १५ उमेदवार विजयी होवून या पक्षाने घवघवीत यश संपादन केले होते. परंतू बहूजन मजूर पक्षाला मात्र आपले उमेदवार निवडूण आणने सोडाच; उमेदवार उभे करणेही जमले नाही. त्यामूळे या पक्षाची जबाबदारी घेणे ओठे आव्हाण स्विकारणे होय. आणि ते आव्हाण मी स्विकारले.
एक आठवण: 03 मार्च 2014 रोजी मानवी हक्क अभियान, बहुजन मजूर पक्षाचे नेते मा. अ‍ॅड. एकनाथ आव्हाड साहेब हिंगोलीत आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माझेसोबत रामदास सोनवणे, लखन यादव आदी.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब क्षिरसागर यांचेसमोर केलेल्या भाषणात मी माझा मानवी हक्क अभियानात केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच माझेवर टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे जाहीर आभार सुद्धा मानले. मान्यवर कांशिराम यांना अपेक्षित बहूजनवाद तसेच, दिवंगत नेते अ‍ॅड. एकनाथ दादा आव्हाड - जिजा आणि दादासाहेब क्षिरसागर यांच्या स्वप्नातील पक्ष प्रत्यक्षात साकार करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी दिले. यावेळी दादासाहेब यांनी वयाच्या 75-76 व्या वर्षीही खणखणीत भाषण केले. त्यांच्या प्रत्येक वाक्यात बाबासाहेब यांनी समाजासाठी कसा त्याग केला याचे अनेक उदाहरणे दिली. कांशिराम यांचा संघर्षही त्यांनी कथन केला. त्यामूळे खुपच ऊर्जा मिळाली. कार्यक्रमाला माझ्यासोबत अ‍ॅड. रामराव जुमडे, अ‍ॅड. सुनिल बगाटे, शिवाजी इंगोले, धुळे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.

विशेष म्हणजे बैठक 27-03-2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्राम गृह, वाशिम येथे ठेवण्यात आली होती. वेळ जरी 11 वाजेची असली तरी बैठक 12 वाजता सुरु होईल असे वाटले. परंतू माळहिवरा येथे गेल्यावर केशव अवचार यांनी दादासाहेब क्षिरसागर यांना फोन करून ते किती वाजता पोहचणार अशी विचारणा केली असता, ते एक तासापुर्वीच पोहचले असल्याचे सांगितले. त्यामूळे आम्ही तेथून माझ्या कारने कुठेही न थांबता निघून गेलो. दुपारी 3 वाजता कार्यक्रम झाल्यावर असे कळले की, एसटी बस बंद आहे, रेल्वेची वेळ बरोबर नाही आणि खाजगी वाहनाचे भाडे परवडत नाही. त्यामूळे दादासाहेब ऑटोने अमरावतीहून वाशिमला आले होते. आणि ते पण आम्ही पोहचण्यापुर्वी एक ते दिड तास अगोरदर. हे ऐकूण खूपच वाईट वाटले. आणि प्रेरणा सूद्धा मिळाली. व्यक्ती म्हातारा झाला तरी, मन जर तरूण असेल तर तुमचा पराभव कुणीही करू शकत नाही.

--- अ‍ॅड. रावण धाबे, हिंगोली.

Post a Comment

1 Comments

Ad Code