A, B and C Summary Report In Criminal Cases: जाणून घ्या फौजदारी प्रकरणात पोलिसांकडून दाखल होणारे ए, बी आणि सी फायनल अहवाल

What is Summary Report Filed By Police in Criminal Cases फौजदारी प्रकरणात पोलिसांकडून पाठवले जाणारे सारांश अहवाल म्हणजे काय?

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस “A सारांश”, “B सारांश”, “C सारांश” अहवाल पाठवत असतात. हे समरी किंवा सारांश अहवाल म्हणजे काय आणि त्याचा भारतातील गुन्हेगारी खटल्यांवर काय परिणाम होतो हे आपण समजून घेवूयात. माझ्याकडे हिंगोली सत्र न्यायालयात प्रॅक्टीस करीत असताना अशा केसेस आल्या आहेत. त्यामध्ये दोन अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल झालेल्या केसेसचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बासंबा पोलिस ठाणे, ता. हिंगोली येथील एक केस आहे. तर दुसरी कळमनुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे.


सरकार विरुद्ध हरीहर केसमध्ये सन्माननीय न्यायालयाने पोलिसांची बी फायनल समरी फेटाळून लावली तर, सरकार विरूद्ध विठ्ठल जाधव प्रकरणात स्विकारली केली आहे. तर आता या केसेच्या निमित्ताने हे अहवाल काय आहेत? त्याचा अर्थ काय आहे? आणि न्यायालयाने ते मान्य किंवा अमान्य केल्यास त्याचे काय परिणाम होतात? हे याठिकाणी थोडक्यात पाहूयात.

How The Final Summary Report Sent By The Police सारांश अहवाल कोणत्या कायद्यानुसार पाठवले जातात?

सारंश अहवालाबाबत फौजदारी प्रक्रीया संहितेत कोणतीही तरतूद नाही. परंतू हे सारांश अहवाल / अंतिम अहवाल बॉम्बे पोलिस मॅन्युअल 1959 (बॉम्बे पोलिस कायदा, 1951 च्या XXII, बॉम्बे पोलिस (विस्तार आणि दुरुस्ती) कायदा, 1959 चा XXXIV आणि इतर विभागीय नियमन अंतर्गत नियम समाविष्टीत आहेत.) खंड III यानुसार पाठवले जातात.

"ए सारांश" केस/ A Summary Case Filed By Police

Where the police classify the case as true but undetected, or Where there is no clue whatsoever about the culprits or property, 'A' summary report is submitted. So here the investigation revealed that an offence has been committed but no sufficient evidence is available to proceed. Before accepting this report the Magistrate should hear the first informant.


या प्रकरणात गुन्हा घडलेला असतो, मात्र तपास होवू शकत नाही. तसेच या केसमध्ये आरोपी आणि मुद्देमाल यांचा पण शोध लागत नाही. म्हणजेच गुन्हा घडलेला असतो, मात्र आरोपी, मुद्देमाल मिळत नसल्याने पोलिस त्याला मॅजिस्ट्रेटकडे ‘ए समरी’ रिपोर्ट म्हणून पाठवतात आणि प्रकरण निकाली काढण्याची विनंती करतात. हा अहवाल दाखल झाल्यावर न्यायदंडाधिकारी फिर्यादी/तक्रारदार यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतात आणि प्रकरण चालवितात.

"बी सारांश" केस/ B Summary Case Filed By Police

1. Where the police classify the case as maliciously false or when there is no evidence or prima facie case against the accused after investigation, B Summary Report is submitted by police before the Magistrate.

2. B summary report is filed when false or frivolous cases are instituted.

3. Usually B summary report is filed as a final report on completion of the investigation.

4. Where the Magistrate, accepts the B summary report the only course left to the magistrate is to drop all further action. Upon acceptance of the report by Court, the accused will be discharged.

5. Before the magistrate proceeds to drop a case by accepting B summary report, he is bound to issue notice to the informant and hear him.

6. Accused has no locus standi to participate in proceedings that would take place before Magistrate for deciding whether or not to accept 'B' summary report.

7. The police may register a case against the informant under section 211 of the Indian Penal Code, stating that he had given false information to the police with malicious intention.

या प्रकरणात पोलिस न्यायालयात असा अहवाल पाठतात, की दाखल झालेला गुन्हा फिर्यादीने खोटी आणि दुर्भावनापूर्ण फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केले त्यानुसार तपासा दरम्यान आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा किंवा प्रथमदर्शनी प्रकरण आढळून आलेले नाही. हा अंतिम अहवाल न्यायालयाने स्वीकृती केल्यास आरोपींची निर्दोष मुक्तता केली जाते. हा अहवाल एफआयआर दाखल होवून तपास पुर्ण झाल्यानंतरच पाठविला जातो, ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या प्रकरणात आरोपींची नावे असली तरी मात्र त्यांचे विरोधात सबळ पुरावा मिळत नाही.

समरी अहवालावर सुनावणी चालू असताना फिर्यादीस नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाते. आरोपींना मात्र आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात नाही. विशेष म्हणजे अशा प्रकरणात पोलिस तक्रारदार बनून मूळ तक्रारदारावर खोटी तक्रार दिली म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम 211 नुसार गुन्हा सुद्धा दाखल करू शकतात.


"सी सारांश" केस/ C Summary Case Filed By Police

1. When the case is neither true nor false C Summary report is submitted by the Police.

2. When the criminal case was filed due to mistake of facts or the offence complained about is of a civil nature, the information given to police may be neither true nor false.

3. Generally no legal action may be taken against the first informant.

4. Before accepting a C summary report the magistrate is bound to hear the first informant.

What does C report mean?
जेव्हा एखादी केस खरी किंवा खोटी नसते अशा प्रकरणी पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल केला जातो. जेव्हा तथ्यांचा चुकीचा अर्थ काढून फौजदारी गुन्हा दाखल केला गेला किंवा ज्या गुन्ह्याची तक्रार केली गेली ते प्रकरण दिवाणी स्वरूपाचे अशा वेळी ती तक्रार खरीही नाही आणि खोटीही नाही असे तपासात निष्पन्न होते. या प्रकरणात मूळ तक्रारदारावर कोणतीही कारवाई केली जात नाही वा गुन्हा पोलिसांकडून दाखल केला जात नाही. या प्रकरणात सुद्धा सी समरी अहवाल स्विकारण्यापूर्वी मूळ तक्रारदाराचे म्हणणे संबंधित न्यायदंडाधिकारी यांना ऐकूण घ्यावे लागते.

लेखामध्ये काही दुरुस्त्या चुका असल्यास किंवा सूचना असल्यास संपर्क करा-
(अ‍ॅड. रावण, मो. 6003000038)

Post a Comment

0 Comments

Ad Code