Death Sentence by Shooting: दोषी आढळ्यास भारतातही दिला जातो गोळ्या घालून मृत्यूदंड

भारतीय दंड संहितेखाली दोषी आढळ्यास मरेपर्यंत फासावर लटकवून दिला जातो मृत्यूदंड

"State should not punish with vengeance". Emperor Ashoka, म्हणजेच सम्राट अशोकांच्या म्हणण्यानुसार सरकारने सुडबुद्धीने शिक्षा देवू नये. याचाच अर्थ असा की, सरकारने शिक्षा देताना कुणाला तरी न्याय मिळतो याच हेतूने शिक्षेची अंमलबजावणी करावी. सुडबुद्धीने, सुड उगवण्याच्या हेतूने किंवा बदला घेण्याच्या उद्देशाने शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असे सम्राट अशोकांचे मत होते. भारतीय कायदा आयोगाने सुद्धा हाच हेतू समोर ठेवून वेळोवेळी फाशीच्या शिक्षेबाबत शिफारशी केल्या आहेत.
File Photo (Google.in)
भारतीय दंड संहितेखाली (Offences under Indian Penal Code) फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Code 1898), 1898 चे कलम 368 (1) मरेपर्यंत गळ्याला फाशी देण्याची तरतूद आहे. तर सुधारीत फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Code) 1973 मध्ये या शिक्षेत कोणताही बदल करण्यात आला नाही. नविन Code of Criminal Code 1973 मध्ये कलम 354(5) नुसार, "जेव्हा कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते, तेव्हा तो मरेपर्यंत त्याला गळ्यातील फासावर लटकवले जावे", अशी शिक्षा दिली जाते. भारतात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना, मरेपर्यंत दोरीने फासावर लटकवणे जाणे ही स्वातंत्र्यापुर्वीपासून अवलंबलेली सामान्य पद्धत आहे.

फाशीला मानवीहक्क गटांचा विरोध

परंतु मानवी हक्कांबद्दल जागरूकता वाढत असल्याने अनेक मानवीहक्क गटांचा युक्तिवाद आहे की, दोरीने फाशी देणे ही एक अमानवी पद्धत आहे. या गटाच्या म्हणण्यानुसार ज्याला फाशी दिली जाते त्याचा दीर्घकाळापर्यंत मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. आणि त्यात सत्यताही आहे. कारण फाशी देण्यात आलेल्या व्यक्तीला सुमारे मृत घोषीत करण्यासाठी तब्बल 40 मिनिटे एवढा कालावधी लागतो. या दरम्यानच्या काळात त्याला फासावरच ठेवले जाते किंवा त्याला मृत घोषीत केले जात नाही. तसेच दोरखंडाच फास बरोबर बसला नाही तर या पद्धतीत दोषी व्यक्ती मृत होण्याऐवजी कोमात जातो. थोडक्यात या प्रक्रीयेत दोषीला प्रत्यक्ष मरण्यापुर्वी अनेक मरणयातना भोगाव्या लागतात. त्या उलट गोळ्या घालून ठार केल्यास 1 ते 2 मिनिटात मृत्यू होतो. तसेच विषायी इंजेक्शन दिल्यास सुद्धा 5 ते 9 मिनिटातच मृत घोषीत केले जाते. त्यामूळे फाशीच्या शिक्षेला अनेकांचा विरोध असल्याचे दिसून येते Death Penalty by Shooting by Firing Squad.

जगभरातील मृत्यूदंडाच्या शिक्षा

जगभरात अनेक देशांमध्ये मृत्यूदंडाच्या विविध पद्धती आहेत. या पद्धतींमध्ये मरेपर्यंत कारागृहात फाशी, सार्वजनिक ठिकाणी फाशी, गिलोटिनवर लटकविणे, फायरिंग स्क्वॉडद्वारे गोळ्या झाडून ठार करणे, गॅस चेंबरमध्ये घालणे, प्राणघातक इंजेक्शन देणे आणि अगदी इलेक्ट्रोक्युशन म्हणजे विजेचा शॉक देणे या पद्धातींचा समावेश आहे.

गोळीबार पथकाद्वारे गोळीबार करून ठार करणे

मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची कायदेशीर पद्धत म्हणून गोळीबार करून दोषीला ठार करण्यात येते. ही पद्धत रशिया, चीन, थायलंड आणि अमेरिकेतील उटाह आणि ओक्लाहोमा सारख्या काही राज्यांमध्ये कार्यरत आहे.

गोळीबार पथकाद्वारे गोळीबार करून भारतातही मृत्यूदंड?

दोरीने फाशी देणे ही भारतात फाशीची पारंपारीक पद्धत असताना, गोळ्या घालून एखाद्या दोषीला ठार केले जाते का? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे. कारण, भारतात असे काही कायदे आहेत जे दोषीला गोळीबार पथकाद्वारे गोळ्या घालून ठार मारण्याची परवानगी देतात. परंतू ही पद्धत मर्यादित परिस्थितीतच वापरली जाते. कारण ही पद्धत केवळ लष्कर, नौदल आणि वायुसेनेद्वारे अंमलात आणली जाऊ शकते. ही शिक्षा केवळ सैन्य गुन्ह्यांसाठीच दिली जाते. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सैनिकावर कोर्ट मार्शलमध्ये (सैन्य न्यायालय) खटला चालविला जातो आणि त्यात दोषी आढळल्यास शिक्षा दिली जाते.

वायुसेना कायद्याच्या कलम 163 मध्ये अशी तरतूद आहे की,: "मृत्यूची शिक्षा सुनावताना, कोर्ट-मार्शल, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, गुन्हेगाराचा मृत्यू होईपर्यंत गळ्यात फाशी घालून मृत्यूदंड देईल किंवा गोळ्या घालून ठार मारले जाईल." अशीच तरतूद थल सेना व नौदलाच्या कायद्यात करण्यात आली आहे. आर्मी अ‍ॅक्ट (Section 166 of Army Act 1950), नेव्ही अ‍ॅक्ट (Navy Act 1957) आणि एअरफोर्स अ‍ॅक्‍टमुळे (Section 163 of Air Force Act 1950) कोर्ट मार्शलद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीला फाशी देण्याची परवानगी मिळते. दोषी व्यक्तीला फाशी दिली जाईल की त्याला/तिला गोळ्या घालून ठार मारावे याबाबत हे कायदे कोर्ट मार्शलला निर्णय घेण्याचा अधिकार देतात.

गोळ्या घालून ठार करण्यावर कायदा आयोगाचे मत

भारतीय कायदा आयोगाने 'फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची पद्धत आणि आनुषंगिक पद्धती' यावरील 187 व्या अहवालात तपशीलवार विश्लेषण केले आहे. फाशी, फायरिंग स्क्वॉड आणि प्राणघातक इंजेक्शन - फाशीच्या तीन पद्धतींमधील 10-बिंदूंच्या तुलनेच्या आधारे आयोगाने असे मत मांडले की गोळी झाडून ठार मारणे ही मृत्यूदंडाची शिक्षा तुलनेने अधिक मानवी आणि कमी यातनादायक पद्धत आहे.

कायदा आयोगाने आपल्या शिफारशीत असेही नमूद केले आहे की, लष्करी कायदा, नौदल कायदा आणि हवाई दल कायदा यांनी गोळीबार करून दोषीला ठार करण्याची पद्धत कायम ठेवावी. तसेच या कायद्यात प्राणघातक इंजेक्शन्सद्वारे शिक्षा देण्याचा समावेश समावेश करण्याबाबत विचार करावा आणि फाशीची पद्धत म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा वगळावी, अशी शिफारस आयोगाने केली आहे.

लेखाबद्दल काही तक्रारी, सूचना असल्यास raavan@yahoo.com वर संपर्क करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये संदेश पाठवा 

Post a Comment

0 Comments

Ad Code