Death Warrant or Black Warrant in Marathi: पाहून घ्या, दोषी व्यक्तीच्या फाशीपूर्वी बजावण्यात येणारा डेथ वॉरंट अथवा ब्लॅक वॉरंट कसा असतो

डेथ वॉरंटची कायदीय प्रक्रीया आणि फौजदारी प्रक्रीया संहितेमधील तरतूदी  

डेथ वॉरंट Death Warrant or Black Warrant

डेथ वॉरंटला ब्लॅक वॉरंट असेही म्हणतात. हे वॉरंट ज्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे अशा न्यायालयाकडून तुरुंग अधीक्षकांना संबोधित केले जाते आणि नंतर मृत्यू वॉरंटची अंमलबजावणी झाली असल्याचे प्रमाणित करून तुरुंग अधीक्षकांकडून परत संबंधीत न्यायालयाला पाठविले जाते. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे वॉरंट फौजदारी प्रक्रिया संहितेच्या द्वितीय अनुसूचीच्या फॉर्म 42 (Form 42 of the Second Schedule of the Code of Criminal Procedure u/s. 413 and 414 of CrPC) अंतर्गत दिले जाते. आणि हे वॉरंट फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 413 व 414 नुसार पाठविले जाते.

डेथ वॉरंट किंवा ब्लॅक वॉरंट जारी करण्यापूर्वी अनेक कायदीय तरतूदी पार पाडाव्या लागतात. या प्रकरणात व्यक्तीच्या जिवन मरणाचा प्रश्न असतो. तसेच ज्याला शिक्षा ठोठावायची असते, त्याच्या कुटुंबियांच्याही भावनांचा प्रश्न असल्याने फॉर्म 42 या नमुन्यातील हा वॉरंट जारी केल्यानंतर आणि त्यापुर्वीही या कायदीय तरतूदींची काळजीपुर्वक अंमलबजावणी न केल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई होत असते. या लेखात या कायदीय प्रक्रीयेवरही चर्चा करण्यात आली आहे.  

Death or Black Warrant हाच तो डेथ वॉरंटला ब्लॅक वॉरंट 

वॉरंट जारी करण्याबाबत काय आहेत सीआरपीसी कलम 413 आणि 414 मधील तरतूदी

कलम 413- कलम 368 खाली दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी
Execution of order passed under section 368:-

जेव्हा मृत्यूदंड कायम करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या खटल्यात, उच्च न्यायालयाचा त्यावरील कायमीकरणाचा किंवा अन्य आदेश सत्र न्यायालयाला मिळेल, तेव्हा ते न्यायालय वॉरंट किंवा जरूर ती अन्य उपाययोजना करुन असा आदेश अंमलात आणवील. When in a case submitted to the High Court for the confirmation of a sentence of death, the Court of Session receives the order of confirmation or other order of the High Court thereon, it shall cause such order to be carried into effect by issuing a warrant or taking such other steps as may be necessary.

कलम 414- उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्यू दंडाची अंमलबजावणी Execution of sentence of death passed by High Court:-

जेव्हा उच्च न्यायालयाने अपीलांती किंवा पुनरिक्षणांती मृत्यूची शिक्षा दिली असेल तेव्हा उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यावर सत्र न्यायालय वॉरंट काढून शिक्षा अंमलात आणवील.  When a sentence of death is passed by the High Court in appeal or in revision, the Court of Session shall, on receiving the order of the High Court, cause the sentence to be carried into effect by issuing a warrant.

कलम 368- शिक्षादेश कायम करण्याचा किंवा दोषसिद्धी रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार. कलम 366 अंतर्गत सादर केलेल्या कोणत्याही प्रकरणात, उच्च न्यायालय- Power of High Court to confirm sentence or annul conviction. In any case submitted under section 366, the High Court-

(क) शिक्षादेश कायम करू शकते, किंवा कायद्याने प्राधिकृत केलेला इतर कोणताही शिक्षादेश देवू शकते, (a) may confirm the sentence, or pass any other sentence warranted by law, or
किंवा
(ख) दोषसिद्धी रद्दबातल करू शकते आणि सत्र न्यायालय आरोपीला ज्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवू शकले असते अशा कोणत्याही अपराधाबद्दल त्याला दोषसिद्ध ठरवू शकेल अथवा, त्याच किंवा सुधारित दोषारोपावरून नव्याने संपरिक्षा करण्याचा आदेश देवू शकेल, (b) may annul the conviction, and convict the accused of any offence of which the Court of Session might have convicted him, or order a new trial on the same or an amended charge, or
किंवा
(ग) आरोपी व्यक्तीला निर्दोष मुक्त करू शकते (c) may acquit the accused person:,
 
परंतु, अपील दाखल करण्यासाठी देण्यात आलेला अवधी संपेपर्यंत किंवा अशा अवधीत अपील सादर केले असल्यास, अशा अपीलचा निपटारा होईपर्यंत या कलमांतर्गत शिक्षादेश कायम करण्याचा कोणताही आदेश दिला जाणार नाही. Provided that no order of confirmation shall be made under this section until the period allowed for preferring an appeal has expired, or, if an appeal is presented within such period, until such appeal is disposed of.

सारांश- सर्व न्यायालयीन याचिका, राष्ट्रपती यांचेकडील दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर संबंधीत ज्या सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती ते सत्र न्यायालय डेथ वॉरंट किंवा ब्लॅक वॉरंट जारी करते. त्यानंतर ठरलेल्या स्थळ, दिवशी आणि निश्चीत केलेल्या वेळी दोषीला फाशी दिली जाते. ही फाशी सीआरपीसीचे कलम 413 व 414 नुसार दिली जाते. हे वॉरंट सीआरपीसीच्या दुसर्‍या अनुसूचित दिलेल्या फॉर्म 42 मधील नमुन्यात असते आणि फाशीची अंमलबजावणी झाल्यावर हे वॉरंट पुन्हा संबंधित सत्र न्यायालयाला पाठविले जाते.

लेखामध्ये काही दुरुस्त्या चुका असल्यास किंवा सूचना असल्यास संपर्क करा-
(अ‍ॅड. रावण, मो. 6003000038)

Post a Comment

0 Comments

Ad Code